प्रो कबड्डी लीग; बंगालकडून हरयाणा स्टीलर्स पराभूत

पुणे: मनिंदरसिंगच्या पल्लेदार चढायांच्या जोरावर बंगाल वॉरियर्सने हरयाणा स्टीलर्सचा 48-36 असा पराभव केला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये शानदार विजय मिळविला.

शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत बंगालने पूर्वार्धातच 30-14 अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला होता. त्यांनी या 20 मिनिटांमध्येच दोन लोण चढविले. पुन्हा उत्तरार्धात सुरूवातीलाच त्यांनी आणखी एक लोण मारला. मात्र त्यांच्या खेळाडूंनी केलेल्या चुकांचा फायदा घेत हरयाणा संघाने एक लोण नोंदवित सामन्यात उत्कंठा निर्माण केली. तरीही बंगालने आपली आघाडी कायम राखली होती.

त्यांच्याकडून मनिंदरसिंगने 19 चढायांमध्ये 18 गुणांची कमाई करीत महत्त्वाचा वाटा उचलला. के. प्रपांजन (7 गुण), बलदेवसिंग (6 गुण) व मोहम्मद नबीबक्ष (5 गुण) यांनी त्याला चांगली साथ दिली. हरयाणाच्या विनयकुमारने 14 गुण मिळवित सुपरटेनची कामगिरी केली. विकास कंडोलाने 9 गुण नोंदवित शर्थीची झुंज दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)