इराण-सौदीतील मध्यस्थीसाठी इम्रान खान रवाना

इस्लामाबाद: इराण आणि सौदी अरेबियामधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रविवारी दिवसभराच्या दौऱ्यावर तेहरानला रवाना झाले. 2015 मध्ये इराणच्या नेतृत्वाखालील आघाडी सैन्याने येमेनवर हल्ले सुरू केल्यापासून आणि 2016 मध्ये सौदीतील शिया धर्मगुरूंना फाशी देण्यात आल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.

प्रदेशातील शांतता व सुरक्षेसाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंतप्रधान इम्रान खान 13 ऑक्‍टोबरला इराणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान इम्रान खान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमानेई आणि अध्यक्ष हसन रूहानी यांच्यासमवेत बैठक घेतील,असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.

इम्रान खान यांच्यासमवेत परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी आणि पंतप्रधानांचे मनुष्यबळ विकास विभागाचे विशेष सहायक सय्यद जुल्फिकार अब्बास बुखारी आहेत.

सौदीमधील तेल केंद्रांवर 14 सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्‌यामुळे इराण आणि सौदी अरेबियामध्ये ताणाताणीला जोरदर सुरूवात झाली अहे. सौदी आणि मित्रदेशांनी या हल्ल्यांबद्दल इराणला जबाबदार धरले आहे. तर इराणने हे आरोप फेटाळले आहे. 11 ऑक्‍टोबर रोजी सौदी किनाऱ्यावरील लाल समुद्रात इराणी मालकीच्या तेलाच्या टॅंकरवर हा ड्रोन हल्ला झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.