पुणे – शहरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांच्या सेवेसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे.
शहरातील महत्वाच्या पाच चौकात वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. यामध्ये तज्ञ डॉक्टर्स, रुग्णवाहिका, स्वयंसेवक यांचा समावेश असणार आहे. शहरातील बेलबाग चौक, पूरम चौक टिळक रोड, एस पी कॉलेज, अलका टॉकीज चौक, शनिवार वाडा येथे वैद्यकीय सेवा उपलब्ध असणार आहे तसेच दोन रुग्णवाहिका फिरत्या असणार आहेत.
आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई – 9970077773, डॉ. नंदकिशोर बोरसे 9422032696, डॉ. शंतनू जगदाळे 9011916607, डॉ. कुणाल कामठे 9890616365, डॉ.नितीन बोरा 9822969661, सदाशिव कुंदेन 9921574499 या नंबरवर संपर्क साधवा असे आवाहन पुणे पोलीस न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणूकीमुळे उशीरापर्यंत धावणार मेट्रो; जाणून घ्या वेळापत्रक…
गणेश विसर्जन मिरवणूकीच्या दिवशी वनाज ते गरवारे या मेट्रो मार्गावर रात्री एक वाजेपर्यंत मेट्रोची सेवा असणार असल्याचे महामेट्रोकडून जाहीर करण्यात आले आहे, त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला दिवसभर आणि रात्रीही पुणेकरांना मेट्रोच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
ही सेवा केवळ पुणे शहरातील वनाज ते गरवारे मार्गासाठी असणार असल्याचे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले. तर दर अर्ध्या तासाला मेट्रो असणार आहे.
महामेट्रोकडून 6 मार्चपासून वनाज ते रामवाडी मार्ग सुरू करण्यात आला आहे. दररोज सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत सुरू असते. मात्र, शहराची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी पर्यंत सुरू असल्याने तसेच रात्री 12 नंतर विसर्जन मिरवणूकीत वाद्य वाजविण्यास बंद करण्यात येत असल्याने त्यानंतर नागरिक घरी परतात.
त्यामुळे, मेट्रोकडून शुक्रवारी सकाळपासून शनिवार पहाटे 1 वाजे पर्यंत मेट्रोची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.