नवी दिल्ली: भारत-चीन सीमेच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समधील सहा राफेल लढाऊ विमान २७ जुलै रोजी भारत पोहोचतील. हे विमान मे महिन्यात दाखल होणार होते. परंतु कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ते वेळेवर भारतात पोहचू शकले नाहीत.
फ्रान्सहून उड्डाण केल्यानंतर ही विमाने भारताच्या अंबाला येथील हवाई दलाच्या स्टेशनवर उतरतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. पहिले चार राफेल विमानांचे आगमन होणार होते. परंतु आता सहा विमान भारतात पोहोचतील अशी माहिती मिळाली आहे.
लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये प्रचंड तणाव आहे. या दृष्टीने ही बातमी फार महत्वाची आहे. दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर आहेत. अशा परिस्थितीत राफेल विमान भारताला देण्यात आल्यास वायुसेनेची संख्या वाढेल.
तत्पूर्वी, जूनच्या सुरुवातीस केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या फ्रेंच समकक्ष फ्लॉरेन्स पार्ले यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. यावेळी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले होते की कोरोना विषाणूची साथी असूनही राफेल विमान वेळापत्रकानुसार भारताला देण्यात येईल. ही माहिती संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
भारतीय वायुसेनेच्या आपत्कालीन आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी सप्टेंबर २०१६ मध्ये भारत सरकारने ३६ लढाऊ राफेल विमानासाठी फ्रान्सबरोबर ६० हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली.