मुंबई – आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही.असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसैनिकांना केलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/zNxanlUVpg
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022
राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “उद्या (मंगळवार,3 मे) ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं, हे उद्या माझ्या ट्विटव्दारे आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढंच ! असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.