IMP NEWS : राज ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; संध्याकाळी लॉकडाऊनवर बोलणार?

मुंबई –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यावर काल शनिवारी छोटीशी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पाठीच्या स्नायूंमध्ये साकळलेल्या रक्तामुळे त्यांना त्रास होत होता म्हणून त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांना शनिवारी अचानक लीलावती रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही राज ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र, आता ते रुग्णालयातून घरी परतले आहेत.

यानंतर आता राज ठाकरे आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर आपले मत व्यक्त करतील अशी शक्यता आहे. दरम्यान, आधीपासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना लॉकडाऊन विरोधात आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणती भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.