“नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह…मोदीजी तो गुलाबी चष्मा काढा”

राहूल गांधींची मोदी सरकारवर सडकून टीका

नवी दिल्ली : देशात काही दिवसांपासून चार लाखांचा टप्पा पार करणारी कोरोनाची आकडेवारी दिसून आली आहे . गेल्या 24 तासात देशात 3,29,942 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासात 3,56, 082 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत तर 3,876 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिवसभरातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. आकडेवारीनुसार देशातील करोना रुग्णसंख्येत घट होत असली, तरी मृत्यूंचे प्रमाण मात्र काळजी वाढवणारे आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन लाख २९ हजार ९४२ करोनाबाधित आढळून आले आहेत. 

 

देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा मिळत नाहीये. बिहार, उत्तर प्रदेश मधून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी मृतदेह वाहून आले आहेत. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता वर्तवली आहे.  याच मुद्यावरून आज राहुल गांधी यांनी कॉंग्रेल नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. 

राहुल गांधी म्हणाले,’नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह, रुग्णांच्या बाहेर मैलांपर्यंत रांग, जीवन सुरक्षेचा हक्कच हिरावून घेतला. पंतप्रधान, तो गुलाबी चष्मा उतरवा ज्यातून सेंट्रल विस्ताशिवाय काहीच दिसत नाही,” असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील टीका केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मलिक यांनी, उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये लोकांवर अंत्यसंस्कार करायला लाकडे देखील शिल्लक राहिलेली नाहीत. त्यामुळे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडले जात आहेत, असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी गंगा नदीत मृतदेहांचा खच पडल्याच्या सोशल मीडियावरील व्हीडिओसंदर्भात भाष्य केले. माझं मूळ गाव उत्तर भारतात आहे. तेथील लोकांचे आम्हाला फोन येत आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे आकडे लपवले जात नाहीत. कोणालाही उपचारापासून वंचित राहावे लागेल, अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. भाजपशासित राज्यात मात्र चित्र वेगळे आहे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले. महाराष्ट्राला बिल्लारीमधून येणारा ऑक्सिजन बंद करण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील ऑक्सिजन गोव्याला देणे योग्य नाही. हे सर्व महाराष्ट्रात जाणीवपूर्वक अडचण निर्माण करण्यासाठी सुरु आहे. योगी सरकार म्हणते आम्ही फक्त स्थानिक लोकांनाच लस देणार. केंद्र सरकार याबाबत काय विचार करत आहे? देशात एकच पद्धत असली पाहिजे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.