बॉलीवूडमधील पॉप्युलर सिंगर यो यो हनी सिंह म्हणाला की, तो एक पॉपस्टार आहे, रॅप कलाकार नाही. कारण त्याने पॉप संगीत, रॅप लाईन आणि सुरांना आपल्या गाण्यांमध्ये गायले आहे.
हनी सिंहने एका मुलाखतीत सांगितले की, मी स्वत:ला रॅप कलाकार म्हणणार नाही. मी रॅप, सिंगिंग आणि पॉप म्यूझिकचे मिश्रण देखील करतो. मी रॅप कलाकार नाही. मी फक्त रॅप करत नाही, तर गाणेदेखील म्हणतो. यामुळे आपण मला एक पॉपस्टार असे म्हणू शकता.
तो म्हणाला की, आता रॅपमध्ये खूप बदल झाला आहे आणि अनेक कर्तबगार लोक याकडे वळत असून ते चांगल्या प्रकारे रॅप करत आहेत. मी आताच काही गाणे गायले आहेत. तसेच मी जीवनातील कठिण काळात “धीरे-धीरे से मेरी जिंदगी’ हे गाणे गायले होते. हे गाणे 1990मधील “आशिकी’ चित्रपटातील सुपरहिट गाणे आहे. हनी सिंहच्या रीमेक व्हिडिओत ऋतिक रोशन आणि सोनम कपूर यांनी काम केले आहे.