मुंबई – तिकीट बारीवर अक्षरश: धुमाकूळ घालणाऱ्या सुपरहिट “जोकर’या खलनायकपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हॉलिवूड चित्रपटसृष्टीत सर्वोकृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून “जोकर’ चित्रपटाचा ओळखले जाते. ऑस्कर 2020 मध्ये या चित्रपटाला वेगवेगळी अशी 11 नामांकने मिळाली होती.
View this post on Instagram
#Repost @hbomax | Who’s got Joker on their re-watch list? Stream it on HBO or via HBO Max in May.
टॉड फिलिप्सच्या दिग्दर्शनात बनलेला हॉलिवूड चित्रपट ‘Joker’ 2019 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटात सुपरस्टार ‘वॉकिंग फिनिक्स’ याने जोकरची व्यक्तिरेखा साकारली होती. दरम्यान, आता ‘जोकर 2’ चित्रपटासाठी वॉकिंग फिनिक्सला तब्बल 367 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.
View this post on Instagram
वॉकिंग फिनिक्सने आजवर कधीही एकाच फ्रेंचाईजीच्या मूव्ही सीरिजमध्ये काम केलेलं नाही. किंबहूना केवळ एकच चित्रपट करुन हा अभिनेता फ्रेंचाईजी सोडून देतो. परंतु जोकरसाठी मात्र त्याने आपला हा नियम मोडण्यास होकार दिला आहे.
2007 साली प्रदर्शित झालेल्या ‘द डार्क नाईट’ या चित्रपटामुळे जोकरला खरी प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात अभिनेता हिथ लेजर याने जोकर ही खलनायक व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी हिथला ‘ऑस्कर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
View this post on Instagram