राहुरी, (प्रतिनिधी): राहुरी शहर व परिसरात काल रात्रीच्या दरम्यान बेकायदेशीरपणे दारुची वाहतूक करीत असणाऱ्या सहा जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून राहुरी पोलीस पथकाने ताब्यात घेतले. तसेच पकडलेल्या आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील पिंगळे, देवेंद्र शिंदे, उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, समाधान फडोळ, धर्मराज पाटील, हवालदार सूरज गायकवाड, वाल्मीक पारधी, अशोक शिंदे, आजिनाथ पाखरे, राहुल यादव, पोलिस नाईक प्रविण बागुल,
प्रमोद ढाकणे, कुऱ्हाडे, अंकुश भोसले, कदम आदी पोलीस पथक रात्रीच्या दरम्यान राहुरी शहर व परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान पथकाने राहुरी शहर व तालुक्यातील देवळाली प्रवरा, केडगाव, सडे, चिखलठाण या ठिकाणांहून बेकायदेशीरपणे दारुची वाहतूक करणाऱ्या ताब्यात घेतले.
पकडलेल्या आरोपींकडून देशी, विदेशी व गावठी दारु तसेच दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन असा सुमारे ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत कैलास दगडू पाडळे (रा. देवळाली प्रवरा), विकास शंकर शिंदे,
(रा. केडगाव ता. राहुरी), लक्ष्मण भाऊसाहेब माळी, साईनाथ बर्डे, (रा. सडे), मच्छिंद्र भागवत काकडे, (रा. चिखलठाण, ता. राहुरी), महेश नवनाथ भवर, (रा. झरेकाठी, ता. संगमनेर. या सहा जणांना राहुरी पोलिस पथकाने गजाआड केले. त्यांच्यावर वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आले.