मुंबई – अभिनेत्री इलियाना डिक्रुझने आई झाली आहे. नुकतेच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून इलियाना डिक्रुझच्या गरोदरपणाची चर्चा रंगली होती. अखेर तिच्या घरी एका चिमकुल्या मुलाचे आगमन झाले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. इतकेच काय तर तिने बाळाचा फोटो देखील शेअर केला आहे.
इलियानाने शनिवारी 5 ऑगस्टला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने बाळाचा फोटो शेअर करत चाहत्यांना त्याची झलक दाखवली. “आमच्या लाडक्या मुलाचे या जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होत आहे, हे आम्ही शब्दात मांडू शकत नाही. मन आनंदाने भरून आले आहे”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. इलियानाने तिच्या बाळाचे नाव ‘कोआ फिनिक्स डोलन’ असे ठेवले आहे. तिने 1 ऑगस्ट 2023 रोजी बाळाला जन्म दिला.
View this post on Instagram
इलियानाच्या या पोस्टनंतर सध्या चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, इलियानाने 18 एप्रिल रोजी तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. मात्र विवाह न करता आई होणार असल्याने तिला मोठया प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. इलियानाने एका मुलाला जन्म दिला असला तरी तिने अद्याप बाळाच्या वडिलांबाबत चाहत्यांना माहिती दिलेली नाही. पण जोडीदारासोबतचे फोटो तिने अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले आहेत.