नवी दिल्ली : चर्चिल ब्रदर्स संघाने आय लीग फुटबाॅल स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात रियल काश्मीर संघाचा २-१ ने पराभव करत विजय नोंदविला.
FT: @Churchill_Goa 🔴 hold their nerves to earn 3⃣ important points against @realkashmirfc ⚪️
CB 2⃣-1⃣ RKFC#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #CBRKFC ⚔ pic.twitter.com/EarT0KNBqX
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 19, 2020
चर्चिल ब्रदर्स संघाकडून विल्स डियोन प्लासने १० मिनिटाला पेनल्टीव्दारे पहिला तर मापुइया याने २० व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर रियल काश्मीर संघाच्या रोबिन सिंहने ८२ व्या मिनिटाला संघाकडून एकमेव गोल केला.
या विजयासह चर्चिल ब्रदर्सचा संघ १९ गुणांसह आयलीग गुणतालिकेत तिस-या स्थानी पोहचला आहे. रियल काश्मीर संघाचे १५ गुण असून ते सातव्या स्थानावर कायम आहेत.