सिंहगडरस्ता, दि. 1 -पुणे शहरांमध्ये हजारो पीएमपी बसेस धावतात तर यामधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. सार्वजनिक वाहतूक आणि कमी खर्चात परवडणारी सेवा यामुळे नोकरदार महिला, विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक यांच्याकडून पीएमपी सेवेला प्राधान्य दिले जाते. परंतु, गेल्या महिन्यांत तीन वेळा पीएमपी बसला झालेल्या अपघातामुळे पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच वाहतुकीचे
प्रवाशांच्या सुरक्षेची आम्ही पूर्ण काळजी घेतो. आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र असल्याशिवाय बस रस्त्यावर धावत नाही. बसमध्ये आग विझविण्याचे उपकरण दिलेले आहेत तसेच कर्मचाऱ्यांनाही तसे प्रशिक्षण नियमितपणे दिले जाते. सीट बेल्ट संदर्भात पत्रक काढून त्याबद्दल चालकांना सुरक्षित प्रवासासाठी सूचना देण्यात येईल.
– लक्ष्मीनारायण मिश्रा,
व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
इतर वाहन चालकांप्रमाणेच पीएमीप चालकांनी सीट बेल्ट लावणे सुरक्षेच्या दृष्टीने अनिवार्य आहे. त्यांच्या प्रशासनाने तशा सूचना त्यांच्या चालकांना द्याव्यात आणि त्यानंतर जर चालकांनी त्या सूचना पाळल्या नाहीत तर त्यावर कारवाई करण्यात येईल. यासाठी अगोदर चालकांची मानसिकता सीट बेल्ट लावण्याची झाली पाहिजे.
– राहुल श्रीरामे,
उपायुक्त पुणे वाहतूक शाखा