वॉशिंग्टन : आधुनिक काळामध्ये सर्वांची जीवनशैली बदलून गेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकारासह कर्करोगाचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता एका नवीन संशोधनाप्रमाणे दररोज घरातलीच कामे करून तुम्ही कर्करोगाला दूर ठेवू शकता. दररोज दम लागेपर्यंतअसे किमान एक जरी काम केले तरी कर्करोगाचा धोका 20 टक्क्याने कमी होतो, असे या संशोधन अहवालात म्हटले आहे.
सर्वसाधारणपणे आधुनिक काळात लोक फिट राहण्यासाठी एखाद्या जिममध्ये जात असतात किंवा घरी व्यायाम करत असतात. पण असे जर कोणाला शक्य होत नसेल तर दररोज घरात केली जाणारी कामेच त्यांना फिट ठेवू शकतात. कोणत्याही व्यक्तीने किमान दिवसातून असे एक काम केले ज्यामुळे त्यांना खूप दम लागला तरी ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे या अहवालात म्हटले आहे.
द कन्वर्सेशन जर्नल नावाच्या आरोग्य विषयक नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने दिवसभरात किमान चार ते पाच मिनिटे अशा प्रकारे शरीर दमवणारे घरगुती काम केले तर त्याला आरोग्याचा फायदा होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. हे संशोधन ब्रिटनमध्ये झाले असून त्यामध्ये 22,000 पेक्षा जास्त लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. या 22 हजार लोकांमध्ये 55% महिला होत्या तर 2000 असे लोक होते.
ज्यांना कधीही आत्तापर्यंत कर्करोग झालेला नाही तसेच या लोकांपैकी बहुतेक लोक दिवसभरात फक्त दोन ते अडीच मिनिटेच घरगुती काम करत होते. ज्या लोकांना कोणत्याही जिममध्ये जाणे किंवा व्यायाम करणे आवडत नाही आणि घरीच व्यायाम करणे त्यांना पसंत नसते. अशा लोकांनी दररोजच्या घरगुती कामांना जर प्राधान्य दिले आणि त्यामध्ये शरीर दमवणारी कामे केली तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो असे या संशोधनात म्हटले आहे.