पारनेर – जिद्द व चिकाटीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन आ. नीलेश लंके यांनी केले. तालुक्यातील मावळेवाडी येथील स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, पोलिस उपनिरीक्षक तुषार भोर, सीए गाडगे, नानासाहेब पठारे, सरपंच विठ्ठल पोटघन, नानाभाऊ कुरकुटे, सरपंच उदय कुरकुटे, उपसरपंच गणेश पठारे, प्रा. संतोष खोडदे, उद्योजक कांतिलाल भोसले, बाळा ब्राह्मणे, जयवंत कुरकुटे, तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत भोसले, अध्यक्ष दत्ता पठारे, सुरेश कलाप, शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे आदी उपस्थित होते.
मावळेवाडी येथील महेश पठारे व सागर कदम यांनी एमपीएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन मंत्रालयात एएसओ झाल्यानिमित्त ग्रामस्थांनी युवकांचा, तसेच निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार केला. आ. लंके यांनी, मावळेवाडी गाव आज खऱ्या अर्थाने पुढे आले असून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आश्वासन या वेळी दिले.
नगर दक्षिणची जबाबदारी माझ्याकडेच…!
खोक्यामुळे माझा आवाज थोडा कमी झाला असला, तरी लवकरच तो वाढेल, असे मिश्किलीने आ. लंके यांनी म्हटल्यावर एकच हशा झाला. तसेच नगर दक्षिणची जबाबदारी माझ्याकडेच असल्याचे आ. नीलेश लंके यांनी या वेळी सांगितले.