‘दोन पेक्षा अधिक मुलांना जन्म दिल्यास दापत्यास व्हायला हवा तुरुंगवास’

मुंबई – बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणावत सध्या ट्विटरवर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.  तिच्या ट्विटमुळे सोशलवर कंगना  सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.   अशातच तीने आणखी एक ट्विट करून भारताच लोक संख्येवरून आपलं मत मांडले आहे. सध्या सोशलवर नव्या वादंग होण्याची शक्यता आहे.

कंगना  राणावतने  ट्वीटमध्ये लिहिलं,’देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे लोक मरत आहेत. कागदावर फक्त १३० कोटी भारतीय असते तरी याशिवाय जवळपास २५ कोटीपेक्षा जास्त भारतीय हे अवैध प्रवासी मजूर आहेत जे बाहेरच्या देशातून येऊन भारतात वास्तव्य करत आहेत. म्हणून देशातील लोकसंख्येला आडा घालण्यासाठी कठोर कायदे तयार करण्याची गरज आहे..’

तिने पुढे ट्विट केले आहे की,’भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकसंख्येवर मत करण्यासाठी  नसबंदी करायला लावली होती. मात्र यामुळे त्या निवडणूक हारल्या होत्या आणि त्यानंतर त्यांची हत्यासुद्धा करण्यात आली होती. पण आता आजच्या काळात भारतातील वाढती लोकसंख्या हे एक संकट आहे. यावर उपाय म्हणून एखाद्या दापत्यानं जर तिसऱ्या मुलाला जन्म दिला तर त्याला दंड किंवा काही वर्षांचा तुरुंगवास अशाप्रकारची शिक्षा दिली गेली पाहिजे.’

दरम्यान, कंगना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.