ड्युटी फर्स्ट! रणरणत्या उन्हात गर्भवती महिला डीएसपी कर्तव्यावर हजर

नवी दिल्ली – देशभरात करोनाने हाहाकार माजविला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे. अशामध्ये आरोग्य व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. अशातच छत्तीसगडमधील एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, नागरिकांनाही करोना प्रतिबंधक नियमांचा विसर पडल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. यामध्ये छत्तीसगडमधील दंतेवाडाच्या डीएसपी शिल्पा साहू गर्भवती असूनही स्वतः रस्त्यावर उतरत विनाकारण मोकाट फिरणाऱ्या लोकांना करोनाचे गांभीर्य समजावून सांगत आहेत. तसेच करोनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी महिला पोलिसाच्या कर्तव्याला सलाम ठोकला आहे

दरम्यान, करोनाच्या संकटात गर्भवती असूनही सामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या या महिला अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, काहींनी मात्र त्यांनी स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी, काम करू नये म्हणत सुनावले आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.