Bachu Kadu – राज्य सरकारने शब्द पाळला नाही तर मी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्यासोबत आंदोलनात उतरणार, असा थेट इशाराच आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांनी दिलेली 24 तारीख जवळ येत आहे,
17 तारखेला जरांगे नवीन आंदोलनाची घोषणा करणार आहेत असेही ते म्हणाले. सरकारने मनोज जरांगे यांना आतापर्यंत शिंदे समितीने काय-काय काम केले त्याचा अहवाल द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
बच्चू कडू म्हणाले, अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्जच्या वेळी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे सरकारने मागे घ्यावेत. यासंदर्भात जरांगे यांना शब्द दिला आहे. त्यामुळे मी शब्दांचा पक्का आहे, नाहीतर मी जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होणार, असा शब्दांत त्यांनी सुनावले.
दरम्यान, बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या वेळी राज्य सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये मध्यस्ती करून जरांगे यांच्या आंदोलन थांबवले होते. त्यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मराठ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. त्या मागणीला आमदार बच्चू कडूंनीही पाठिंबा दिला आहे.