नवी दिल्ली – वाहतूक नियम मोडणाऱ्यांना आणि दारू पिऊन गाडी चालविल्यास वाहतूक पोलिसांकडून आतापर्यंत तुम्ही कारवाई झालेली बघितली असेल मात्र आता जर वाहनांवर वाहनांवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा वगैरे बांधत असाल तर तुम्हाला तब्बल 5000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
नव्या वाहतूक नियमांनुसार डिफेक्टिव्ह नंबर प्लेट असेल तर तब्बल 5000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अद्याप नवे नियम लागू झालेले नसले तरी दिल्लीत पोलिसांनी ही मोहिम हाती घेतली आहे.
अनेक लोक मुद्दामहून काळी पट्टी किंवा लिंबू मिर्ची, टेप किंवा रस्सी नंबरप्लेटवर बांधतात. यामुळे गाडीचा पूर्ण नंबर सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिसांचे कॅमेऱ्यांमध्ये दिसत नाही. यामुळे ऑनलाईन चलन काढण्यात समस्या येते. यामुळे दिल्ली पोलिसांनी या महाभागांना अद्दल घडविण्यासाठी मोठी मोहीम सुरु केली आहे.