मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी टीका केल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एमआयएमला तोंड सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांच्या बद्दल कोणतीही टीका सहन करणार आहि. टीका केली मनसे दणका देईल. आमच्या नांदाला लागलेत तर महागात पडेल.दणका माहित नसेल तर अबू आझमीला जाऊन विचजरा विचारा असा दम त्यांनी एमआयएमला दिला आहे.
दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना आतापर्यंत मशिदीच्या भोंग्यांचा त्रास झाला नाही का ? एमआयएमने सर्वांना शिंगावर घेतलं आहे. आम्ही मनसेलाच काय कोणालाही घाबरत नाही, अशी टीका इम्तियाज जलिल यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती. त्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जहरी टीका केली आहे.