पिंपरी चिंचवड – खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे सध्या राज्यभर शिवपुत्र संभाजी या नाटकाचे प्रयोग करताहेत. नुकताच पिंपरी चिंचवड येथे त्यांचा या नाटकाचा प्रयोग पार पडला. मात्र यानंतर जमलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधत अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ‘मोफत तिकीट दिल नाही तर नाटकाचा प्रयोग कसा होतो’ तेच पाहतो अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांबाबत नाराजी व्यक्त करत अनिल कोल्हे यावेळी म्हणाले,”“आज पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत खेदजनक अनुभव आला आहे. मी त्या पोलीस बांधवांचं नाव सांगणार नाही. कारण विरोध व्यक्तीला नाही, विरोध प्रवृत्तीला आहे. ही प्रवृत्ती नाटकाचे मोफत तिकिट मागण्याची आहे. अगदी शेवटी तीनशे रुपयांचं तिकिट काढून आपल्या लेकरांना संभाजीमहाराजांचा इतिहास दाखवायला आलेल्या प्रत्येक पालकाचे मी अभिनंदन करतो”
अमोल कोल्हे पुढे म्हणाले,” या प्रवृत्तीला हेच सांगू इच्छितो इथं बसलेले सगळे जण टॅक्सचे पैसे देतात त्यातुन आपल्याला महिन्याचा पगार मिळतो. छत्रपतींच्या नाटकासाठी फ्री पास मागता आणि पास दिला नाही तर कस नाटक होत ते बगतो हे आपण सांगत असाल तर माझी हात जोडून विनंती आहे अशा शुल्लक कारणासाठी पोलीस दलाच्या प्रतिमेला गालबोट लावू नका” असं कोल्हे आईवेळी म्हणाले.
एका कलाकाराची कळकळीची विनंती!#ShivputraSambhajiMahanatya #ShivputraSambhaji #ChhatrapatiSambhajiMaharaj #PimpriChinchwad @Dev_Fadnavis @PCcityPolice
(1/3) pic.twitter.com/LDR85uJq2x
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 13, 2023
नाशिकच्या पोलीस आयुक्तांचे दिले उदाहरण
“प्रामाणिकपणे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, आतापर्यंत संभाजीनगर, नाशिक, निपाणी, कोल्हापूर, कराड या प्रत्येक ठिकाणी पोलीस बांधवांनी प्रचंड सहकार्य केलं. नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांनी तर २ हजार ५०० पोलीस बांधवांना त्यांच्या कुटुंबासह या महानाटकाचं तिकिट काढून दाखवलं. मात्र, आज मी खेदाची बाब शेअर करत आहे”. असही कोल्हे यावेळी म्हणाले.