नवी दिल्ली – मध्यप्रदेशमधील पोटनिवडणुकांच्या तारखांचा सस्पेन्स आणखी काही दिवस कायम राहणार आहे. तरीही प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून महासचिव प्रियंका गांधी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. यावर भाजप नेत्याने टीका केली आहे.
ग्वाल्हेरमधील भाजप नेते जयभान सिंह पवैय्या यांनी म्हंटले कि, प्रियांका गांधी आमच्यासाठी आव्हान नाही तर त्या काँग्रेससाठी पनौती आहेत. आणि भाऊ-बहीणपैकी कोणीतरी येथे येईल, याची आम्ही वाटत पाहत आहोत. आम्ही प्रियांकाचे स्वागत करतो. प्रियंका उत्तर प्रदेशात गेल्याने जे झाले तसेच मध्यप्रदेशातही व्हावे, असे त्यांनी सांगितले आहे.
प्रियंका हमारे लिए चुनौती नहीं, वो कांग्रेस के लिए पनौती है और हम इंतजार कर रहे थे कि यहां भाई-बहन में से किसी एक का तो कदम पड़े इसलिए प्रियंका के आने का BJP स्वागत करती है और जो उ.प्र में उनके जाने से हुआ वो म.प्र. में भी हो: म.प्र. आगामी उपचुनाव पर जयभान सिंह पवैया,BJP,ग्वालियर pic.twitter.com/9kszPrYN6U
— ANI_HindiNews (@AHindinews) September 26, 2020
दरम्यान, पोटनिवडणुकांच्या दृष्टीने मध्यप्रदेशला महत्व प्राप्त होणार आहे. त्या राज्यातील तब्बल 27 जागांवर पोटनिवडणुका होतील. सध्या भाजप मध्ये गेलेले कॉंग्रेसचे बंडखोर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रभाव क्षेत्रात कमलनाथ यांनी पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली आहे.