नवी दिल्ली – 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्षांनी देशव्यापी दौऱ्याची आखणी केली आहे.तसेच आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार करत आहेत.
याच प्रचारा दरम्यानचा एमआयएमच्या एका जिल्हाध्यक्षाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अलिगढचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ते या व्हिडियोमध्ये प्रचारावेळी ओवेसींना पंतप्रधान करायचं असल्यास मुस्लिमांना काय करावं लागेल, याबद्दलचा सल्ला नूर लोकांना देत आहेत.
नेमकं काय म्हणाले अलिगढचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर
‘मुस्लिमांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार? असदुद्दीन ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होणार? शौकत अली साहेब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कसे होणार?’, असे प्रश्न विचारुन नूर मुस्लिम जनतेला अधिकाधिक मुलं जन्माला घालण्याचं आवाहन करत आहे.