कोलकाता – देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना आणखी फोफावू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता बाळगण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये अद्यापही धार्मिक स्थळे व सण-उत्सवांना परवानगी देण्यात आली नाही.
अशातच आता पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राज्यात दुर्गा पूजेला परवानगी नाकारण्यात येणार असल्याची चर्चा फेटाळून लावली असून याबाबतची अफवा एका राजकीय पक्षाकडून दूषित हेतूने पसरवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
यावेळी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी, राज्य सरकार दुर्गा पूजेला परवानगी देणार नाही असं म्हंटल्याचं सिद्ध करून दाखवा मी जनतेसमोर १०१ वेळा उठाबशा मरेन असं खुलं आवाहन दिलं आहे.
ममता यांच्या बोलण्याचा कल भाजपकडे असल्याचं बोललं जातंय. यावेळी ममता यांनी सरकारने दुर्गा पुजेबाबत अद्याप कोणतीही आढावा बैठक घेतली नसल्याने याबाबतचा निर्णय झाला नसल्याचेही स्पष्ट केलं.
A political party is spreading vicious rumours about Durga Puja, so far we haven’t had any meeting on it. Prove that West Bengal govt has said there will be no Durga Puja, I will do sit-ups in front of people 101 times: CM Mamata Banerjee pic.twitter.com/kTEBEFvm7V
— ANI (@ANI) September 8, 2020