दुबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आॅस्ट्रेलिया संघाचा फलंदाज यांच्यामध्ये कसोटी क्रमावारीतील अव्वल स्थानाच्या शर्यतीत विराटने बाजी मारली आहे. बांगलादेश विरूध्द झालेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केल्याचा फायदा विराटला झाला, तर पाकविरूध्दच्या कसोटीत अपेक्षित कामगिरी न केल्याचा स्मिथला तोटा झालाय. आयसीसीने बुधवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली. ज्यामध्ये विराट ९२८ अंकासह अव्वलस्थानी पोहचला आहे तर स्मिथ ९२३ अंकासह दुस-या स्थानवर आहे.
Virat Kohli back to No.1!
David Warner, Marnus Labuschagne and Joe Root make significant gains in the latest @MRFWorldwide ICC Test Rankings for batting.
Full rankings: https://t.co/AIR0KN4yY5 pic.twitter.com/AXBx6UIQkL
— ICC (@ICC) December 4, 2019
बांगलादेशविरूध्द कोलकाता येथील कसोटीत विराटने १३६ धावा केल्या होत्या तर स्मिथने पाकविरूध्दच्या पहिल्या कसोटीत ४ आणि दुस-या कसोटीत ३६ धावा केल्या होत्या. आॅस्ट्रेलियाच्या डेविड वाॅर्नरने देखील क्रमवारीत मोठी झेप घेतली. पाकविरूध्द अॅडिलेड कसोटीत नाबाद त्रिशतकी खेळी करणा-या वाॅर्नरला १२ गुणांचा फायदा झाला.त्यामुळे वाॅर्नर पाचव्या स्थानी पोहचला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ८७७ अंकासह तिस-या स्थानी आहे.
आॅस्ट्रेलियाचा मार्न्स लाबुशाने पहिल्यांदाच टाॅपटेन मध्ये पोहचला आहे. तो क्रमवारीत आठव्या स्थानी आहे. टाॅपटेनमध्ये विराट व्यतिरिक्त चेतेश्वर पूजारा चौथ्या व अंजिक्य रहाणे सहाव्या स्थानी आहे.