मुंबई :- भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या तिकीट विक्रीवरून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्री-तिकीट बुकिंगसाठी बुक माय शो या संकेतस्थळावर तिकीट बुक केल्यावरही आपली प्रत मिळेपर्यंत अनेकांना तब्बल 12 तास प्रतीक्षा करावी लागली.
प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यांची तिकीट विक्रीही करण्यात येत होती. त्याची विक्रमी वेळेत ही तिकिटे संपली, त्यामुळे अनेकांना नाराजी सहन करावी लागली.
मुख्य स्पर्धेतील नॉन इंडिया सामन्यांच्या तिकीट विक्रीलाही मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, आयोजनाच्या गोंधळामुळे चाहत्यांचा संताप अनावर होत होता.
दरम्यान, भारतात येत्या 5 ऑक्टोबर तेल 19 नोव्हेंवर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. त्यातील भारतीय संघाचा सहभाग नसलेल्या सामन्यांचीही तिकिटे विकली गेली आहेत. या सामन्यांनाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ज्या दिवशी या तिकिट विक्रीला प्रारंभ झाला तेव्हाच ऑनलाईट तिकिट विक्रीची साईट क्रॅश झाली होती.
मात्र, त्यात सुधारणा केल्यावर ती पुन्हा कार्यरत झाली व काही वेळातच नॉन इंडिया सामन्यांचीही तिकिटे संपली. या स्पर्धेत प्रत्येक ठरावीक दिवशी काही तिकिटे बॉक्स ऑफिसवरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.