भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजाला आयसीसीकडून मोठा धक्का बसला आहे. रवींद्र जडेजा आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले, ज्या अंतर्गत त्याला दोषी धरून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जडेजाने आयसीसीच्या नियमांचे केले उल्लंघन –
पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या खेळीत रवींद्र जडेजा गोलंदाजीत चांगली कामगिरी करताना दिसला. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन संघाच्या 5 विकेट्स घेतल्यामुळे त्याचे खूप कौतुक होत आहे. पण यादरम्यान सामन्याच्या 46व्या षटकात असे काही घडले की, ज्यामुळे रवींद्र जडेजाला आयसीसीने दोषी ठरवले आहे.
Cricketer Ravindra Jadeja has been fined 25 per cent of his match fee for breaching Level 1 of the ICC Code of Conduct during the first Test against Australia in Nagpur: ICC
(File Pic) pic.twitter.com/RlwinT2qG4
— ANI (@ANI) February 11, 2023
दोषी ठरवण्याचे कारण म्हणजे, रवींद्र जडेजाने त्याच्या हातातील बोटांना त्रास होत असल्यामुळे त्याने मोहम्मद सिराजच्या हातातून एक क्रिम घेतली आणि बोटाला लावली. पण असे करण्याआधी पंचाची परवानगी घ्यायला हवी होती, असे नियम सांगतो. पण रवींद्र जडेजाने अंपायरची परवानगी न घेता बोटाला क्रीम लावली त्यामुळे तो दोषी ठरला आहे.
जडेजाला ठोठावला दंड –
रवींद्र जडेजाला एका सामन्याच्या फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला आहे. रवींद्र जडेजाने स्वतःची चूक मान्य केली आहे. ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये रवींद्र जडेजाविरुद्ध चुकीचा प्रचार केला जात होता की त्याने चेंडूशी छेडछाड केली. पण पंचांनी रेफ्रींना दिलेल्या सल्ल्यानुसार रवींद्र जडेजाने बॉलशी छेडछाड करण्यासाठी क्रीमचा वापर केला नाही.
चारही पंचांनी मान्य केले की रवींद्र जडेजाने वेदना निवारण क्रीम वापरली. त्यामुळे चेंडूला कोणताही धोका नव्हता. इतकेच नाही तर रवींद्र जडेजाच्या शिस्तभंगाच्या विक्रमात 1 गुणाचा अवगुणही जमा झाला आहे. गेल्या 24 महिन्यांतील रवींद्र जडेजाचा हा पहिला डिमेरिट पॉइंट आहे.