मुंबई – सोशल मीडियावर नेहमीच बॉलीवूड स्टार किड्सची चर्चा रंगलेली असते. सध्या सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रविवारी जुहूमधील स्पोर्ट्स ग्राऊंडवर फुटबॉल खेळतानाचा त्याचा हा व्हिडिओ आहे. यात तो मैदानातून शर्टलेस बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी त्याच्याभोवती चाहत्यांची गर्दी झाल्याचेही पाहायला मिळते. सध्या इब्राहिम त्याच्या शर्टलेस व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे.
इब्राहिमचा शर्टलेस लुक पाहून अनेकांना नव्वदच्या दशकातील सैफ अली खानची आठवण झाली. त्याच्या व्हिडिओ अनेकांनी कमेंट केली आहे. ‘सैफची झेरॉक्स कॉपी आहे’, ‘हा तर ‘हम तुम’मधला सैफ दिसत आहे.” अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये इब्राहिम चाहत्यांसोबत सेल्फी घेताना देखील दिसून येत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, इब्राहिम अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीला ते डेट करत असल्याचे म्हंटले जात आहे. अनेकदा हे दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. सर्वांत पहिल्यांदा या दोघांना एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना पाहिलं गेलं होतं. त्यावेळी पलक पापाराझींपासून आपला चेहरा लपवताना दिसली होती. याशिवाय सारा अली खान आणि इब्राहिम हे काही दिवसांपूर्वीच गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. यावेळी भाऊ-बहिणींसोबत पलकसुद्धा होती.
पलक आणि इब्राहिमच्या नात्याबाबत अद्याप दोघांनी कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र एका मुलाखतीत पलकने “मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही, मी माझ्या कामाकडे अधिक लक्ष केंद्रीत करते,” असे म्हणत तिने यावर अधिक बोलणे टाळले. दरम्यान, पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून पदार्पण केले आहे. त्यानंतर आता इब्राहिम अली खानही लवकरच बोमन ईरानीचा मुलगा कोयोज ईरानीच्या ‘सरजमीन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.