मुंबई – अभिनेत्री अनसूया भारद्वाजने ‘पुष्पा’सह ‘द रुल’, ‘भीष्म पर्व’, ‘F2: फन अँड फ्रस्ट्रेशन’, ‘यात्रा’ आणि ‘रंगस्थलम’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात ती स्वत:च्या भावना व्यक्त करत ढसाढसा रडताना दिसत आहे.
या व्हिडिओ अनसूया म्हणते की, ‘आशा आहे की तुम्ही सर्व बरे असाल. मला माहीत आहे की माझी ही पोस्ट पाहणारे तुम्ही सगळेच गोंधळलेले असाल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माझ्या माहितीत आला ज्यामुळे आपण लोकांशी कनेक्ट होऊ शकतो, ते एक चांगले ठिकाण बनवू शकतो, जेणेकरून आपण एकमेकांना आधार देऊ शकू. तसेच आनंद आणि दु:ख शेअर करू शकतो.
पोस्ट शेअर करण्याचा उद्देश म्हणजे तुम्हाला सांगण्याचं आहे की सर्व पोझ, फोटोशूट, स्पष्टता, स्मित, नृत्य इत्यादी सर्व गोष्टी माझ्या आयुष्याचा एक भाग आहेत. तुम्हीही भावनेने भरलेली लोक आहात, म्हणून मी ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते आणि हे माझ्या आयुष्याचे काही टप्पे आहेत. जिथं मी पुरेशी समर्थ नाही. मी कमजोर व्यक्ती आहे.
मी माझ्या भावना तुमच्याशी थेट शेअर करू शकते. जेव्हा मला वाटतं की माझं धैर्य तुटतं आहे तेव्हा मी स्वत:ला वेळ देते आणि रडते. पण एक-दोन दिवसांनी मी जुन्या जीवनात आनंदाने परतते. एक सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून मला भावनांबद्दल तटस्थ राहावे लागेल. मला सर्वांना सांगायचंय की, इतरांना समजून घ्या. जरी तुम्हाला कोणी काही सांगितलं तरी कदाचित त्याचा दिवस वाईट जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा, मी सुद्धा तेच शिकण्याचा प्रयत्न करत आहे.’
View this post on Instagram
सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तर तिच्या फॅन्सने तिला काळजी घेण्याता आवाहन केले आहे. दरम्यान, अनसूयाने काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला होता. मात्र आता ती पूर्णपणे बरी असल्याचं अनुसयाने सांगितलं आहे.