मुंबई – मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने प्रसिद्ध युट्यूबर म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या उर्मिला व्हिडिओच्या माध्यमातून वैयक्तिक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या वाईट काळातील अनुभव सांगताला आहे. या काळात तिला नैराश्याचा देखील सामना करावा लागला होता.
सुरुवातीला मालिकांमध्ये काम करताना तिला सेटवर आलेला वाईट अनुभव तिने सांगितला आहे. उर्मिला म्हणाली की, “मी मालिकेच्या सेटवर गेल्यावर माझ्या मेकअप रूममध्ये गेले, तेव्हा मला कोणी मेकअप करेना. मेकअप दादा इकडे तिकडे पळत होते. माझ्याशी कोणी नीट बोलत नव्हतं. काय सुरू आहे कळत नव्हतं. सगळे एकमेकांवर ढकलत होते. मग प्रोडक्शन हाऊसमधून एक मुलगी आली तिनं सांगितंल की चॅनेलने मला काढून टाकण्यात निर्णय घेतला आहे. तेव्हा मला इतकं शून्य फिलिंग आलं की, त्या क्षणी मला वाटलं मी खूप शुन्य आहे, माझ्याहून शून्य किंमतीची या जगात कोणीही नाही असं मला वाटतं होतं.”
पुढे उर्मिला म्हणाली, ‘त्यानंतर एक गाडी आली मला प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये नेलं. तू सारखी आजारी पडतेस, तुझे हेल्थ इश्यू आहेत त्यामुळे तू स्वत:हून मालिका सोडते आहेस, असं माझ्याकडून लिहून घेतलं. हे चुकीचं होतंय मला कळतं होतं पण मी तेव्हा इतकी दु:खात होते. हे माझ्यासाठी चांगलं असेल असा विचार करून त्यावर सह्या केल्या. यात माझ्या खूप गोष्ट गेल्या. माझे पैसे गेले. आजही मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही कारण मी त्यावर सही केली आहे.
“मी सर्वांना मालिका सोडली असंच सांगितलं. पण कोणालाच माहित नव्हतं की, मला काढलं गेलंय. मी सेटवर माज करायचे म्हणून मला काढलं अशा चर्चा सर्वत्र होत होत्या. आपल्याबरोबर सगळ्या वाईट गोष्ट होत असतील तर ते सगळं बंद व्हाव असं आपलं मन आपल्याला सांगत असतं. मी स्वत:ला आरशात बघून मारायचे. तू फालतू आहेस आणि तुला फक्त गोष्टी पाहिजेत त्या मिळवण्यासाठी तू काहीच करू शकत नाही, असं मी स्वत:ला म्हणायचे.” यावेळी उर्मिलाला अश्रु अनावर झाले होते.