उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या पत्नीला भाजपकडून तिकीट

नवी दिल्ली : गतवर्षी देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील  कुलदीप सिंह सेंगर याला  न्यायालयाने  बलात्कार आणि अपहरण प्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी कोर्टाने सेंगरसह सर्व दोषींना १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. मागील वर्षी त्यांच्यामुळे भाजप पक्षाची चांगलीच कोंडी झाली होती.  त्यानंतर भाजपाने या सेंगरला पक्षातून हाकलले होते. मात्र आता त्याच्याच पत्नीला भाजपाने जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,फतेहपूर चौरासी तृतीय मतदारसंघामधून जिल्हा परिषद उमेदवारी कुलदीप सिंह सेंगरची पत्नी संगीत सेंगरला देण्यात आली आहे.  भाजपच्या या निर्णयामुळे स्थानिक जनतेत रोष वाढला आहे. 

दरम्यान,  कुलदीप सिंह सेंगर हा बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिला आहे. २०१७ मध्ये तो भाजपाच्या तिकिटावर निवडून आला होता. मात्र उन्नाव बलात्कार प्रकरणात त्याला अटक झाली होती. त्यानंतर भाजपाने २०१९ मध्ये त्याला पक्षातून हाकलले होते. तसेच त्याचे विधानसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.