मुंबई – सध्या सोशल मीडियावर मराठी अभिनेते ‘संजय मोने’ यांची एक फेसबुक पोस्ट चांगली चर्चेत ठरली आहे. विविध कंपनींच्या कस्टमर केअरमधील एक्झिक्युटिव्हशी बोलताना येणारे अनुभव आपल्या सर्वांनाच माहित आहे. अशाच एक चक्रावून टाकणारा किस्सा संजय मोने यांनी सर्वांशी शेअर केला आहे.
एका वॉशिंग मशिनमध्ये झालेल्या बिघाडाची तक्रार करण्यासाठी मोनेंनी एका नामांकित कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला होता. मात्र “जो करना है करलो..’ असं उत्तर देणाऱ्या आदित्य नावाच्या एका एक्झिक्युटिव्हवर संजय मोने चांगलेच संतापले आहेत.
काय म्हणतात संजय मोने आपल्या पोस्ट मध्ये…
LG कंपनीचं वॉशिंग मशीन गेल्या वर्षी जून महिन्यात विकत घेतलं.कालपासून कपडे धुवायला टाकल्यावर चक.! चक.! असा आवाज येतोय. म्हणून मी LG कस्टमर केअरला फोन केला. वॉरंटी पीरिएड मध्ये आहे असं सांगितलं. समोर आदित्य नावाचा माणूस बोलत होता.
माझं म्हणणं ऐकून घेतल्यावर तो म्हणाला “लॉकडाऊन मुळे आम्ही वॉरंटी वगैरे सगळं देऊ शकत नाही. पण तुम्ही जर येणा-या माणसाचे 475 रु. अधिक जर काही भाग खराब झाला असेल, त्याचे पैसे द्यावे द्यावे लागतील. मग वॉरंटी ला काय अर्थ आहे? त्यावर मी त्याला सांगितलं की ग्राहक मंचाकडे तक्रार करेन त्यावर तो म्हणाला “जो करना वोह करलो.
नहीँ तो लॉकडाऊन के बाद आदमी आयेगा. आता यावर पुढे काय करता येईल? मला त्या “आदित्य”ला धडा शिकवायचाय. लॉकडाऊन काही आपण नाही घोषित केला ना? आपल्या भल्या साठी तो आहे. शिवाय त्यांनी विक्री बंद केली नाहीये..ती चालूच आहे.पुढे काय करू? यावर फालतू विनोदी उत्तरं नकोत..