मुंबई – राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. रोहित पवार हे कर्जत जामखेडचे नेतृत्व करत असले तरी संपूर्ण राज्यभर त्यांचे राजकीय फॉलोविंग आहे. कर्जत जामखेडचे निवडणुकीदरम्यान रोहित पवार यांनी वापरलेली प्रचार यंत्रणा आजही राष्ट्रवादी पक्षामध्ये चर्चेचा विषय असतो. नुकतच रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवर आस्क रोहित पवार (AskRohitPawar) ही मोहीम राबवली. ज्याला तरुणाईसह अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.
यावेळी रोहित पवारांनी आपल्याला ट्विटरवर विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तर दिली. यावेळी रोहित पवारांना अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांसह,पत्रकार,विद्यार्थी अशा विविध गटातील व्यक्तींनी प्रश्न विचारले. या प्रश्नांची रोहित पवारांनी देखील मनमोकळे पणाने उत्तरे दिली.
यादरम्यान एका तरुणीने आपल्याला एका मुलासोबत पळून जायचं आहे असं म्हणत रोहित पवारांकडे सल्ला देखील मागितला. तरुणी ट्विट करत म्हणाली,”दादा माझे एका मुलावर खूप प्रेम आहे आम्ही दोघे लग्न पण करणार आहोत पण मुलाच्या घरचे आमच्या लग्नाला तयार होत नाहीत म्हणुन आम्ही दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला आहे.तुमच्या मते मी काय करू..?”
रोहित पवार यांनी देखील या तरुणीच्या प्रश्नावर शांतपणे उत्तर दिले ते म्हणले,”पळून जाण्यासाठी आई-वडीलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसं नक्की करा” असा सल्ला यावेळी रोहित पवारांनी दिला. तर एका युजरने रोहित पवारांना थेट आजोबांकडून कोणत्या गोष्टी शिकलात ? असा सवाल विचारला.
पळून जाण्यासाठी आई-वडीलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसं नक्की करा!#AskRohitPawar https://t.co/JvWoooTM4c
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2023
आजोबांकडून कोणत्या गोष्टी शिकलात ? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले,”‘गरम वातावरणात डोकं कसं शांत ठेवलं पाहिजे” आस्क रोहित पवार या मोहिमेला तरुणाईसह सर्व वयोगटातील व्यक्तींनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले. तसेच रोहित पवार यांनी देखील अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली.
‘गरम वातावरणात डोकं कसं शांत ठेवलं पाहिजे.’#AskRohitPawar https://t.co/vJ7QjvktqU
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2023