‘या’ गोलंदाजाकडून खूप काही शिकलो… प्रसिद्ध कृष्णाचे मोठं व्यक्तव

इंग्लडविरुद्ध मंगळवारी पार पडलेल्या पहिल्या वनडेत भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने पदार्पण केले. या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने ४ विकेट्स मिळवत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. प्रसिद्ध कृष्णाने ग्लेन मॅक्ग्रा यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ग्लेन मॅक्ग्रा यांच्याकडून खूप काही शिकलो.

ग्लेन मॅक्ग्रा यांनी सर्वात पहिल्यांदा २०१७ मध्ये पेस अॅकॅडमीत प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजीतील कौशल्य सुधारली होती. आयपीएलमध्ये आपला संघ केकेआर सोबत चर्चेदरम्यान सांगितले होते की, कशाप्रकारे त्याला ग्लेन मॅक्ग्रा यांच्याकडून खुप काही शिकायची संधी मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Glenn McGrath (@glennmcgrath11)

प्रसिद्ध कृष्णा म्हणाला, ” ग्लेन मॅक्ग्रा खुपच शांत राहत होते आणि आपल्या लाइन लेंथवर खुपच लक्ष देत होते. ते नेहमी माझ्यासोबत सातत्याबद्दल बोलायचे. मी त्यांच्याकडून पहिली गोष्ट ही शिकलो होतो की, परिस्थिती काहीही असो. परंतु आपण वर्तमानमध्ये राहिला हवे. एका गोलंदाजासाठी हीच सर्वात महत्वाची गोष्ट असते.”

पदार्पणात दमदार कामगिरी केल्यानंतर ग्लेन मॅक्ग्रा दिल्या शुभेच्छा
ग्लेन मॅक्ग्रा यांनी पहिल्या वनडे सामन्यात दमदार कामगिरी केल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाचे कौतुक केले. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करताना लिहले, ” आपल्या वनडे पदार्पणात सर्वात जास्त विकेट्स घेवून विक्रम केल्याबद्दल प्रसिद्ध कृष्णाचे अभिनंदन. वेल डन.”

प्रसिद्ध कृष्णाने आपल्या वनडे पदार्पणाच्या समन्यातच इतिहास रचला. त्याने या सामन्यात सर्वात जास्त ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो वनडे पदार्पणात चार विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. या अगोदर वनडेत सर्वश्रेष्ठ गोलंदाजीचा विक्रम नोएल डेविड (3/21) यांच्या नावावर होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.