नवी दिल्ली : टिडिम रोड एथलेटिक्स यूनियन (टीआरएयू) संघाने नेरोका एफसी संघाचा २-१ ने पराभव करत आय-लीग फुटबाॅल स्पर्धेत पहिला विजय नोंदविला आहे.
FULL-TIME! What a way to register your 1⃣st win in the #HeroILeague 🏆 🤩
The first-ever Imphal Derby comes to an end with a @officialtraufc win 🙌
TRAU 2⃣-1⃣ NFC#TRAUNFC 💥 #LeagueForAll 🤝 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/3aEDBC3Y4e
— Hero I-League (@ILeagueOfficial) January 8, 2020
बौबाकार डायराने ९ व्या मिनिटाला गोल करत नेरोका संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली होती पण नाओचा सिंहने ४१ व्या मिनिटाला गोल करत टीआरएयू ला बरोबरी साधून दिली. यानंतर कृष्णानंद सिंहने ६४ व्या मिनिटाला गोल करत टीआरएयूला २-१ ने आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या शेवटपर्यत नेरोकाला गोल न करता आल्याने टीआरएयूचा विजय झाला.
टीआरएयूचा हा पर्दापण सत्रातील ६ सामन्यातील पहिला विजय ठरला. त्यांना याआधीच्या तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला होता तर दोन सामन्यात त्यांनी बरोबरी साधली होती.