नवी दिल्ली : हरियाणाच्या विविध भागांमध्ये शोभा यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या हिंसाचारात अनेक दुकानांचे नुकसानही झाले. यात ज्या दुकानांचे नुकसान झाले त्यांच्यातील काही दुकाने हिंदूची होती. आता या दुकान मालकांनी दावा केला की त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य करणारे हिंदुत्ववादी होते. या हिंसेत सोहना या ठिकाणच्या एका ऑटोमोबाईल दुकानाचे मोठे नुकसान झाले. या दुकानाचे मालक शत्रुघ्न शुक्ला यांच्या घरासमोर असलेली बुलेट बाईक देखील पेटवून देण्यात आली होती.
सोहना या ठिकाणच्या “मी खोलीतून लपून सर्व पाहिले. यात्रेतील बजरंग दलाच्या लोकांनी येऊन माझी दुचाकी पेटवून दिली. त्यांनी एक स्कूटी आणि एका कारचेही नुकसान केले. मी सर्व काही पाहत होतो, पण मी बाहेर पडू शकलो नाही, कारण शंभर जणांच्या गर्दीसमोर एक माणूस काय करू शकतो? मी असहाय होतो,” असेही शुक्ला यांनी म्हटले. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी वृत्त दिले आहे.
दंगलखोरांनी दुकानाला लक्ष्य का केले असेल, असं विचारलं असता शुक्ला म्हणाले, त्यांना हे मुस्लिमांचे दुकान वाटले असावे.” ते पुढं म्हणाले, “या संपूर्ण गल्लीत फक्त मुस्लिमांची घरे आणि मुस्लिमांची दुकाने आहेत. त्यातले बरेचसे नष्टही झाले. माझे हे एकमेव हिंदूंचे दुकान आहे. त्यामुळे हे सुद्धा मुस्लिमांचे दुकान आहे असे त्यांना वाटले असेल असे त्यांनी म्हटले.
दरम्यान दंगलखोरांना मला सांगायचे होते की मी हिंदू आहे, पण मी खूप घाबरलो होतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता का कोणास ठाऊक, मात्र हे सांगणं देखील धोकादायक होतं, असेही शुक्ला म्हणाले. शुक्ला यांच्या दुकानाचे नाव ‘शिवा ऑटोमोबाईल’ आहे. ते म्हणाले मी शिवभक्त आहे, पण तरीही त्यांनी मलाही सोडले नाही. यावर का बोलणार ही त्यांची मानसिकता आहे. याच जागेवर ते एक दशकापासून दुकान चालवत आहेत. “पण मला कोणत्याही मुस्लिमाकडून कधीही अडचण आली नाही. आम्ही भावासारखे राहतो, असंही शुक्ला म्हणाले.
सोहना येथील ‘शंकर शंभू हॉटेल अँड रेस्टॉरंट’ नावाच्या ढाब्याचीही तोडफोड करण्यात आली असून , त्याचा बोर्ड, किचन आणि फ्रीजचे नुकसान झाले आहे. लोकेश सिंग या मालकाने सांगितले की, तो आणि त्याचे भाऊ वरच्या मजल्यावर लपून बसले होते.
दंगलखोरांनी आत प्रवेश केला, आमच्या खिडक्या तोडल्या, आमचा फ्रीज, आमचा सिलिंडर चोरला, ढाब्याच्या एका भागात आग लावली… आम्ही वरच्या मजल्यावरून सर्व काही पाहत होतो, असंही सिंग यांनी सांगितले.