आंध्र प्रदेशातील हैदराबादमध्ये एका ३६ वर्षीय महिलेने ब्लाउजची शिलाई आवडत नसल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने तिच्या पतीला ब्लाउजची शिलाई सुधारून आणण्यास सांगितले, परंतु पतीने नकार दिला. त्यानंतर या क्षुल्लक गोष्टीवरून दोघांचे भांडण झाले त्यातून पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, ही महिला तिच्या घरी गळफास घेत लटकलेल्या अवस्थेत आढळली. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, शनिवारी महिलेचे पतीसोबत भांडण झाले होते. कारण तिला तिच्या ब्लाउजची शिलाई आवडली नव्हती. पतीने तिच्या सूचनेनुसार तिच्या ब्लाउजची शिलाई सुधारावी अशी तिची इच्छा होती. परंतु पण पतीने तसे केले नाही. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर पत्नीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. पुढील तपास पोलीस करत आहेत.