तळेगाव ढमढेरे येथील स्थिती ः वाहतूक कोंडीमुळे चालक हैराण
तळेगाव ढमढेरे – येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकासमोर छोट्या छोट्या टपऱ्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमणात वाढ होऊन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते, याचा त्रास रोजच्या वाहनचालकांना होत आहे.
तळेगाव ढमढेरे पंचक्रोशीतील गावांचा जुन्या काळापासून मोठा आर्थिक उलाढाल होत असते आणि त्याच प्रमाणात वाढत चाललेली माणसांची वर्दळ, यामुळे या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होतात. येथे राष्ट्रीयकृत बॅंक आहे, दुयम निबंधक कार्यालय, सरकारी दवाखाने असल्यामुळे माणसांची दळणवळणासाठी या गावाची शोभा वाढतच चालली आहे.
आर्थिक संबंधातुन अतिक्रमण होत असल्याचे नागरिक बोलत आहेत; परंतु आजपर्यंत अतिक्रमणे हटवणे किंवा रोखणे कोणत्याही प्रशासनाला जमलेले नाही. हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकाकडे शासनाला पाहण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणावरून पायी चालणारी शाळकरी मुले रस्त्याच्या सर्व बाजूंनी गाड्या लावल्यामुळे रस्त्यावरून पायी प्रवास करावा लागत आहे.
त्यामुळे अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यातच या टपऱ्यासमोर गाड्या पार्क केल्याने रस्त्यावरून वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यावेळी कुठल्याही प्रकारचे प्रशासन मदतीला येत नाही, याचा त्रास वाहतूकदार पायी चालणारे शाळकरी मुले वृद्ध महिला ज्येष्ठ नागरिकांना होत आहे.
तळेगाव ढमढेरेच्या परिसरातील वर्षांपूर्वी सर्व अतिक्रमण हटविण्याचे काम हाती घेऊन काढण्यात आले; परंतु पुन्हा हळुहळु अतिक्रमण वाढतच चालले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये वाटपपत्र, खरेदीखत, करारनामा, विसारपावती व इतर कामासाठी बाहेरगावावरून लोक येतात. त्यांना गाड्या लावण्यासाठी सोय नसल्यामुळे रस्त्याच्या बाजूला पार्क केली जाते. संबंधित खात्याकडून कारवाई होईल का? मृत्यूचा सापळा निघेल का? यावर कारवाई व्हावी अन्यथा शाळकरी मुलांना रोडवर बसून आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आणू नये, असा इशारा नागरिकांकडून दिला.
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकासमोर झालेल्या अतिक्रमणाबाबत संबंधित टपरीधारकांना नोटीस पाठवणार आहे.
-संजय खेडकर, ग्रामविकास अधिकारी
शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. याबाबत अतिक्रमण झालेल्या टपरीधारक यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करणार.
– अरविंददादा ढमढेरे, मानद सचिव शिक्षण प्रसारक मंडळ