अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा

नगर  – निर्भयाच्या मारेकऱ्यांना तात्काळ फासावर लटकविण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सुरु असलेल्या मौन आंदोलनास हरियाली व स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तर सदर सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने राळेगणसिध्दी (ता. पारनेर) येथे अण्णांची भेट घेतली. यावेळी हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, तुलसीभाई पालीवाल, राजेश ओहळ आदी उपस्थित होते.

दिल्लीच्या निर्भयाच्या आरोपींना फाशी होईपर्यंत मौन आंदोलनावर ठाम असलेले अण्णा हजारे यांची हरियाली व स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाने अण्णांची भेट घेऊन त्यांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली. तर या आंदोलनास पाठिंबा देत निर्भयासह देशातील महिलांवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील घटनांमधील सर्व दोषी आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.