धुळे – जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी पत्नी खूप वेळ फोनवर बोलत असल्यामुळे पतीला राग अनावर झाला. यातून त्याने पत्नीवर ब्लेडच्या सहाय्याने सपासप वार केले. नंतर पतीनेही विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा पर्यंत केला. याघटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पती-पत्नी दोघांनाही रुग्णालयात दाखल केेले. पत्नीची तब्बेत गंभीर आहे.
काजल वसंत सोनवणे असे पत्नीचे नाव असून वसंत सक्राम सोनवणे पतीचे नाव आहे. सोमवारी सकाळी काजल बराच वेळ फोनवर बोलत बसली होती. पत्नीने जास्त वेळ फोनवर बोलल्याने काजल व वसंत यांच्यात वाद झाला. यातूनच रागाच्या भरात वसंतने काजलवर प्राणघातक हल्ला केला. ब्लेडच्या सहाय्याने हे वार करण्यात आल्यामुळे काजल गंभीर जखमी झाली आहे. काजलला ह्या अवस्थेत पाहून वसंत घाबरला व त्याने यातूनच विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा पर्यंत केला. या घटनेची शेजाऱ्यांना माहिती मिळताच या दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
हे ही वाचा
ऑनर किलिंगच्या घटनेनं विदर्भ पुन्हा हादरला; २२ वर्षीय तरुणाची हत्या!
भडका! स्वयंपाक करताना अचानक सिलेंडरचा झाला स्फोट; ८ जण जागीच ठार
विवाहबाह्य संबंधांतून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीने किचनमध्ये पुरला मृतदेह