यवतमाळ – प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील अंतरगाव येथे हा प्रकार घडला आहे. समीर शेख छोटु असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सदर घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आर्णी पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली असून मृताचा भाऊ आमिन शेख छोटू याने तक्रार दाखल केली आहे. पवन विजय राठोड वय २१ त्याचे वडील विजय परसराम राठोड वय ५० अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
समीर शेख छोटू याचे प्रेमसंबंध आरोपी पवन राठोड याच्या बहिणीसोबत असल्याचा पवन यास संशय होता. या संशयावरुणच समीरची हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात समीरच्या छाती आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. हल्ला झाल्यानंतर लगेचच त्यास आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आर्णी तालुक्यात ऑनर किलिंगची ही दुसरी घटना आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व गुन्हा दाखल केला. या घटनेप्रकरणी पुढील तपास आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शिवराज पवार, बिट जमादार सतिश चौदार करत आहे.
हे ही वाचा
Pune Crime | खूनाच्या प्रयत्नातील गुन्हेगार अवघ्या आठ तासात ‘जेरबंद’
Pune Crime | किरकोळ कारणावरुन तरुणावर तलवारीने वार; चौघांवर गुन्हा