ह्युस्टन : टेक्सास ए ऍन्ड एम विद्यापिठातील संशोधकांनी करोनावरील औषधाच्या मानवी चाचणीसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. क्षयरोगासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचा उपयोग “कोविड-19’च्या मुकाबल्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी करता येऊ शकतो, यासाठी या उमेदवारांची गरज असल्याचे विद्यापिठाने म्हटले आहे.
मानवावर औषधाच्या चाचणीसाठी प्रांतीय सरकारकडून अनुमोदन मिळालेली टेक्सास ए अँड एम ही अमेरिकेतील पहिली संस्था आहे. बॅसिलस कॅलमेट-गुएरीन किंवा बीसीजी, करोना विषाणूचे परिणाम कमी करतात. त्यामुळे कोविड-19 ची लागण झाल्यावर तुलनेने कमी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल आणि पर्यायाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही घटेल, असा संशोधकांचा दावा आहे.
मूत्राशयाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी देखील वापरली जाऊ शकेल अशी लस परत आणण्याचा प्रयत्न संशोधक करीत आहेत. आधीपासूनच इतर वापरासाठी सुरक्षित सिद्ध झाले असल्यामुळे बीसीजी अवघ्या सहा महिन्यांत कोविड -19 च्या विरूद्ध वापरण्यासाठी उपलब्ध होऊ शकते, असे विद्यापीठाने म्हटले आहे. यामुळे कोविड-19 विरोधातील प्रभावी औषध शोधण्यास आगामी 1-2 वर्षातील संशोधनात मोठा फरक पडू शकतो, असे टेक्सास ए अँड एम हेल्थ सायन्स सेंटरच्या मायक्रोबियल पॅथोजेनेसिस अँड इम्युनोलॉजीतील रिएजंटचे प्रोफेसर डॉ. जेफ्री डी सिरिलो म्हणाले.
आरोग्य सेवेतील कर्मचारी हे या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या क्लिनिकल चाचणीसाठी पात्र ठरणारे पहिले उमेदवार असतील. टेक्सास ए अँड एमच्या देशव्यापी चाचणीत भाग घेण्यासाठी 1,800 स्वयंसेवक भरती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.