पुणे – महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासाठी आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड येथील मराठा समाजातील डॉक्टरांनी एकत्र येऊन काऊंसिल हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे लॉंग मार्च मोर्चाचे आयोजन केले होते.
त्याठिकाणी साखळी उपोषणास बसलेल्या समाजबांधवांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. यामध्ये पुणे शहरातील सर्व पॅथीचे सर्व मराठा डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे, पिंपरी चिंचवड, हडपसर, दिघी, चंदननगर, खराडी, येरवडा, सातारा रोड येथील डॉक्टर सहभागी झाले होते. यामध्ये महिला डॉक्टरांचा सहभाग उल्लेखनीय होता.
वैद्यकीय व्यवसायात नेहमी माणुसकी जपत असताना डॉक्टर कधीही जात, पात, वर्ण, भेद याचा विचार न करता उपचार करीत असतात. त्यामुळे या लॉंग मार्च मधील डॉक्टरांचा सहभाग महत्वाचा होता. त्यातील डॉक्टरांचे म्हणणे होत की, आज उपलब्ध असणाऱ्या आरक्षणामुळे आम्ही आमच्या मुलांना मेरिटमध्ये असूनही योग्य शिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण गरजेचं आहे. आम्ही ते मिळवण्यासाठी कोणताही त्याग करायला तयार आहोत.
आजचा मोर्चा यशस्वी होण्यासाठी प्रामुख्याने डॉ. संभाजी करांडे -पाटील, डॉ. रविंद्र कुमार काटकर, तसेच पिंपरी चिंचवडचे डॉ. सारिका सावंत आणि हडपसर असोशिएशनचे डॉ. चंद्रकांत हरपले, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. मंगेश वाघ, जिपीए चे डॉ. अप्पासाहेब काकडे, डा.ॅ नरेंद्र खेनट, डॉ. वायाल, पुणे डॉक्टर असोशिएशनचे डॉ. विजय कदम, डॉ. सुनील इंगळे, डॉ. राज लवंगे, डॉ. राजेश माने, डॉ. संतोष पवार, डॉ. सचिन केदार, डॉ. अंबिका गरड, डॉ. दिपाली वाघ, डॉ. सीमा मांगडे, डॉ. शीतल शिंदे, डॉ. संगीता खेनट, डॉ. उषा मोरे आदि महिला डॉक्टर, दिघी डॉक्टर असोशिएशन, पेठ डॉक्टर अश्या नामवंत संघटनेचे एकूण 500 पेक्षा जास्त डॉक्टर लॉंग मार्चमध्ये सामील झाले होते.