पहिली पत्नी सुझान खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक रोशन सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून ते डेट करत आहे. अशात आता हे कपल लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
मात्र हे दोघे कधी आणि कुठे लग्न करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हृतिक रोशनने या नव्या नात्याला संमती दिल्याचे बोलले जात आहे आणि दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.
बॉलीवूड इंडस्ट्रीच्या ग्रीक गॉडने सबाची त्याच्या कुटुंबाशी आधीच ओळख करून दिली आहे. त्याचवेळी, हृतिकची माजी पत्नी सुजैन खान देखील अर्सलान गोनीसोबतच्या नात्याचा पाठपुरावा करत आहे. अनेक प्रसंगी हे चौघेही एकत्र क्वालिटी टाइम घालवताना दिसले आहेत. त्यांच्या लग्नाच्या अफवांनी हेडलाइन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच दोघांच्या लग्नाच्या बातम्यांनी चर्चेत आल्या होत्या. मात्र, त्यावेळी राकेश रोशन यांनी आपल्याकडे अशी कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले होते.
हृतिक रोशनने 2014 मध्ये सुझैन खानपासून घटस्फोट घेतला. यानंतर या त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. सबापूर्वी, तो मॉडेल सामंथा लॉकवुडसोबत देखील दिसला होता, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. दुसरीकडे, सबाविषयी बोलायचे झाले तर, तिने २००८ मध्ये आलेल्या ‘दिल कबड्डी’ या चित्रपटाद्वारे अभिनय जगतात पदार्पण केले, परंतु २०११ मध्ये आलेल्या ‘मुझसे दोस्ती करोगे’ या चित्रपटाद्वारे तिला यश मिळाले.