‘हृतिक रोशन’ ठरला मानाच्या ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराचा मानकरी

मुंबई – चित्रपटसृष्टीतील पुरस्कारांमध्ये ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार अतिशय मानाचा पुरस्कार मानला जातो. दरवर्षी भारत सरकारकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. नुकतंच, मुंबईत ‘2020 दादासाहेब फाळके’ पुरस्कारची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यासाठी लवकरच एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात 1969 मध्ये झाली होती.

दरम्यान, यंदाच्या वर्षी आपल्या जबरदस्त भूमिकेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेता ‘हृतिक रोशन’ने सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. ह्रितिकला ‘सुपर 30’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा चित्रपट बिहारमधील ‘आनंद कुमार’ या शिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. अभिनेत्री ‘मृणाल ठाकूर’ देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून आली होती.

2020 दादासाहेब फाळके पुरस्कारांची यादी –

 • सुपर 30 सर्वोत्कृष्ट अभिनेता – हृतिक रोशन
 • मोस्ट प्रोमिसिंग अभिनेता – किच्चा सुदीप
 • बेस्ट एक्टर इन टेलीव्हिजन सीरिज – धीरज धूपर
 • बेस्ट एक्ट्रेस इन टेलीव्हिजन – दिव्यांका त्रिपाठी
 • मोस्ट फेव्हरेट टेलीव्हिजन एक्टर – हर्षद चोपडा
 • मोस्ट फेव्हरेट जोडी इन टेलीव्हिजन सीरीज – सृष्टी झा आणि शब्बीर अहलूवालिया
 • बेस्ट रियालिटी शो – बिग बॉस 13
 • बेस्ट टेलीव्हिजन सीरिज – कुमकुम भाग्या
 • बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल – अरमान मल्लिक
 • मोस्ट फॅशनेबल बिग बॉस 13 कंटेस्टेंट – माहिरा शर्मा
 • बेस्ट एक्ट्रेस वेब सीरीज – दीया मिर्जा
 • बेस्ट ऍन्कर – मनीष पॉल
 • बेस्ट डिजिटल फिल्म – योर्स ट्रूली
 • डेकेड स्टार 2020 – अनुपम खेर
 • बेस्ट पापराजी ऑफ द ईअर – मानव मंगलानी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.