Hrithik And Jr NTR : हृतिक रोशन सध्या त्याचा ‘फायटर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आनंद घेत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे २५ जानेवारीला त्याचा चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाला. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांत 100 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात हृतिक रोशनने स्क्वाड्रन लीडर समशेर पठाणची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर हृतिक रोशन लवकरच यशराज बॅनरखाली बनत असलेल्या ‘वॉर-२’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत आतापर्यंत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आता नुकतेच, वॉर 2 चे शूट कधी सुरु होणार याबाबतची अपडेट समोर आली आहे.
या महिन्यात प्रदर्शित होणार आहे
हृतिक रोशनचा ‘वॉर-2’ हा 2019 मध्ये रिलीज झालेल्या वॉरचा सीक्वल आहे, ज्यामध्ये ह्रितिक व्यतिरिक्त टायगर श्रॉफनेही मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले होते. आता निर्माते 2024 मध्ये त्याचा सिक्वेल आणत आहेत.
एका हिंदी सिने वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर वॉर-2 चे शूटिंग फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर यांनी फ्लोरवर जाण्यापूर्वी या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. वॉर-2 चे पहिले शेड्यूल फक्त मुंबईत शूट केले जाणार आहे.
ज्युनियर एनटीआर साकारणार हे पात्र
या चित्रपटात हृतिक रोशन मेजर कबीर धालीवालची भूमिका साकारत आहे, जो रॉ एजंट आहे, समोर आलेल्या माहितिन्सुअर, ज्युनियर एनटीआर चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. वॉर-२ चे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे, ज्याने यापूर्वी ‘वेक अप सिड’, ब्रह्मास्त्र आणि ‘ये जवानी है दिवानी’ सारखे सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. अलीकडेच, फायटरच्या रिलीजनंतर एका मुलाखतीत बोलत असताना, हृतिक रोशनने वॉर 2 मधील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल अपडेट दिले आहे.