वॉशिंग्टन – संपूर्ण जीवसृष्टी ज्याच्या ऊर्जेवर अवलंबून आहे त्या सूर्याचे अर्धेअधिक आयुष्याचा संपून गेले असून या सूर्याचा अंत कसा होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या नासाने विकसित केलेल्या हबल दुर्बिणीने नुकतेच एक छायाचित्र घेतले आहे. त्या आधारे आता हा अंदाज बांधण्यात येत आहे.
सूर्याचा जन्म चार अब्ज पन्नास लाख वर्षापूर्वी झाला होता आणि हा सूर्य म्हणजे हायड्रोजन आणि हेलिअम यासारख्या गॅसेस पासून तयार झालेला एक मोठा गरम गोळा आहे. सूर्याचा व्यास 14 लाख किलोमीटर असून सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान 5,500 सेल्सियस इतके मानले जाते. सूर्य हा पृथ्वीपासून 1370 प्रकाशवर्ष दूर आहे. सूर्यावर हायड्रोजनचे प्रमाण जसजसे कमी होत जाईल तसतसा त्याचा प्रभाव कमी होत जाईल आणि हैड्रोजन संपल्यानंतर सूर्याचा अंत होईल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
याबाबतचे एक अंदाजे चित्र हबल दुर्बिणीतून टिपण्यात आले आहे. दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचे जे छायाचित्र टिपण्यात आले आहे त्यामध्ये सूर्य इतर ताऱ्यांच्या तुलनेत थोडा कमी सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच सूर्याचा अंत कसा होऊ शकतो याचा अंदाज आता शास्त्रज्ञ बांधत आहेत.
टिपलेल्या छायाचित्रांमध्ये सूर्यावरील विविध गॅसेस दाखवण्यात आले असून हिरव्या रंगाचा हायड्रोजन दिसत आहे. तर निळ्या रंगात ऑक्सिजन आहे शास्त्रज्ञांनी मांडलेला गणिताप्रमाणे सूर्याचे अर्धेअधिक आयुष्य संपले असून त्यावरील हायड्रोजनचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे हायड्रोजनचे प्रमाण संपेल तेव्हा सूर्य फक्त एक पांढऱ्या रंगाचा गोळा राहिल आणि त्याचा अंत होईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.