कसे करायचे लसीसाठी रजिस्ट्रेशन? काय आहे पद्धत? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, अनेकांना अद्याप रजिस्ट्रेशन कसे करायचे, याविषयी संभ्रम आहे. त्यासाठी ऍपवर नोंदणी कशी करायची याविषयीची माहिती.

अशी आहे नाव नोंदणीची पद्धत
www.cowin.gov.in या पोर्टलवर जा
“रजिस्टर’ शब्दावर क्‍लिक करून मोबाइल क्रमांक टाका आणि “गेट ओटीपी’वर क्‍लिक करा
“एसएमएस’द्वारे आलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) टाकून “व्हेरिफाय’ करा
“ओटीपी’ची पडताळणी झाल्यानंतर “रजिस्ट्रेशन’ ऑफ व्हॅक्‍सिनेशन’ पान येईल.
त्यामध्ये वय आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र निवडा, ओळखपत्राचा क्रमांक, नाव, जन्मवर्ष. लिंग, सहव्याधी असल्यास त्याचा पर्याय
असा सर्व तपशील भरून “रजिस्टर’ करा
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर “अकाउंट डिटेल्स’ दिसतील.
एका मोबाइल क्रमांकावरून चार जणांची नोंदणी करता येईल. पानाच्या उजव्या कोपऱ्यातील “ऍड मोअर’वर क्‍लिक’ करा व ज्या दुसऱ्या व्यक्तीची नोंदणी करायची आहे, त्याचे तपशील भरा.

लसीकरणासठी पूर्वपरवानगी घेताना…

“अकाउंट डिटेल्स’ पानावरील “कॅलेंडर’ चिन्हावर किंवा “शेड्युल्ड अपॉइंटमेंट’वर क्‍लिक करा
त्यानंतर “बुक अपॉइंटमेंट फॉर व्हॅक्‍सिनेशन’ पान येईल.
राज्य, जिल्हा, तालुका, पिनकोड माहिती भरून “सर्च’ केल्यावर जवळचे लसीकरण केंद्र निवडता येईल.
लसीकरण केंद्रावर “क्‍लिक’ केल्यानंतर उपलब्ध “स्लॉट’ची (दिनांक आणि क्षमता) माहिती मिळेल.
जवळचे लसीकरण केंद्र निवडून “बुक’ करा. त्यानंतर “कन्फर्म’वर क्‍लिक करा
लसीकरणाची “अपॉइंटमेंट’ बदलण्यासाठीची (रिशेड्युल्ड) सुविधाही उपलब्ध आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.