पुणे – अभिनेता शरमन जोशीचा ‘फौजी कॉलिंग’ हा सिनेमा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्या अगोदरच या सिनेमासाठी एक गुड न्यूज आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा सिनेमा दिल्ली मध्ये टॅक्स फ्री केला आहे. ‘फौजी कॉलिंग’ हा सिनेमा एका सैनिकाच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात जेव्हा सैनिक युद्ध भूमिवर असतो, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांसोबत काय -काय घडते, हे दाखवण्याचा प्रयत्न ‘फौजी कॉलिंग’ या सिनेमात करण्यात आला आहे.
दिग्दर्शकाने मानले दिल्ली सरकारचे आभार :
‘फौजी कॉलिंग’ या सिनेमात बॉलिवूड अभिनेता शरमन जोशी बरोबर बिदिता बाग, मुग्धा गोडसे, माही सोनी, जरीना वहाब, शिशिर शर्मा आणि रांझा विक्रम सिंह अशी तगडी स्टारकास्ट दिसून येणार आहे. दिग्दर्शक आर्यन सक्सेनाने दिल्ली सरकारचे आभार मानताना म्हणाला, “मी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा मनापासुन आभारी आहे.” असं ते म्हणाले.
View this post on Instagram
सैनिकाच्या परिवाराचा दिसणार न पाहिलेला चेहरा :
या सिनेमात सर्व वयोगटातील लोकांच्या भावनांची काळजी घेतली गेली आहे. या सिनेमाच्या माध्यामातून जेव्हा एक सैनिक युद्ध भूमिवर लढत असतो तेव्हा त्याच्या परिवारासोबत काय घडते, ही न पाहिलेली बाजू दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दिल्ली बरोबर इतर राज्यातील काही लोकांनी आपल्या राज्यात सुद्धा हा सिनेमा टॅक्स फ्री केला जावा अशी मागणी केली आहे.
View this post on Instagram
आर्यन सक्सेनाने केले दिग्दर्शन :
‘फौजी कॉलिंग’ या सिनेमाचे लेखन आर्यन सक्सेनाने केले आहे. त्याचबरोबर सिनेमाचे दिग्दर्शन सुद्धा त्यानेच केले आहे. तसेच या सिनेमाची निर्मिती नायदा शेख, ओवेज शेख, विक्रम कुमार, अनिल जैन आणि विजीता वर्मा यांच्याद्वारे करण्यात आली आहे. या सिनेमाचा सहनिर्माता विष्णु एस. उपाध्याय आहे.
View this post on Instagram
या तारखेला होणार प्रदर्शित :
‘फौजी कॉलिंग’ हा सिनेमा 12 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या सिनेमाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे लोकांना ट्रेलर पाहून शरमन जोशीची भूमिका खूप आवडली आहे आणि आता त्यांना सिनेमा प्रदर्शित होण्याची उत्सुकता लागलेली आहे.