तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना कसे वाचवायचे?

कोरोना विषाणूची लाट देशभर वेगाने पसरत असून सर्व वयोगटातील लोक त्याच्या आवाक्यात येत आहेत. आता कोरोना लाट किती तीव्र येईल याबद्दल काहीही सांगितले जाऊ शकत नाही, परंतु तरीही त्यापासून मुलांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. तर कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घ्या जेणेकरुन मुलांना संसर्ग होण्यापासून वाचवता येईल-

  1. मुलांना स्वच्छतेबद्दल शिकवा. या रोगाबद्दल त्यांना जागरूक करुन त्यांना सेफ्टी टिप्स द्या. आपली खोली स्वच्छ करण्यास सांगा. हाइजीनबद्दल सांगा.

  2. मुलांवर सातत्याने लक्ष द्या. त्यांना हलका कफ, खोकला, सर्दी असल्यास प्राथमिक उपचार सुरु करा. मुलांना थंड पदार्थ खायला देऊ नका. जसे आईसक्रीम, कोल्ड ड्रिंक्स, चॉकलेट खायला देणे टाळा.

  3. कोविडचे नवीन लक्षणं जसे पोटदुखी, उलट्या होणे, अतिसार यासारख्या समस्या देखील समोर येत आहेत. लक्षात ठेवा की अशी लक्षणे मुलांमध्ये आढळल्यास नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर मुलेही सुस्त वाटत असतील तर त्यांच्या अवस्थेबद्दल त्यांना विचारा.

  4. आपल्या मुलांना सूर्य नमस्कार करण्यास सांगा. याने त्यांची इम्युनिटी वाढेल, शक्ती वाढेल आणि ते निरोगी राहतील. मुलांच्या फूडमध्ये बदल करा आणि त्यांना हेल्दी फूड खाण्यास भाग पाडा. त्यांच्या आहारात भाज्या आणि फळं आवर्जून सामील करा.

  5. मुलांना सॅनिटायझरऐवजी साबणाने हात धुण्यास सांगा. वारंवार चेहर्‍याला स्पर्श करणे टाळण्याचा सल्ला द्या. मास्क कसा घालायचा आणि कसा काढायचा याबद्दल माहिती द्या.

  6. मुलांना माइंड गेम, ऑनलाइन डांस क्लास, पझल, स्टोरी रीडिंग सारख्या कामांमध्ये व्यस्त ठेवा. मुलांना खुल्या वातावरणात घेऊन जाणेही गरजेचं आहे. अशात त्यांना जरा वेळ टेरेसवर फिरायला न्या. सकाळची वेळ सर्वात उत्तम.

  7. जर कुटुंबातील सदस्य बाहेरून काहीही वस्तू आणत असतील तर मुलांना त्यास स्पर्श करु देऊ नका. आधी आपण ते सामान सॅनिटाइज करा नंतर वापरा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.